“शेतकऱ्याचं नवं ओळखपत्र” – Farmer ID Registration Maharashtra 2025 ची खरी गरज

एक गोष्ट – एका शेतकऱ्याची

सोलापूर जिल्ह्यामधील भीमा नदीच्या किनाऱ्यावर शाम पाटील नावाचा शेतकरी राहत होता. श्याम पाटील याच्याकडे त्याच्या वडिलांची असलेली ३ एकर शेती होती, त्यामध्ये तो फक्त ऊस आणि ज्वारीचे पीक घेत होता. पण त्याला शासनाच्या कोणत्याही योजनेची माहिती न्हवती. त्याच्याकडे योजना संबंधित अपूर्ण माहिती असल्याने तसेच कागदपत्रांची कमी, एजंटची फसवणूक होत होती.

एके दिवशी त्याला त्याच्या गावातील एका ग्रामसेवकाने सांगतिले की, “श्याम, Farmer ID काढून घे.. म्हणजे तुला सगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. इथून श्यामचा प्रवास सुरु झाला – Farmer ID Registration Maharashtra 2025 साठी. त्याच्यासाठी ही एक ओळखच न्हवती तर, त्याच्या हक्कांचा दरवाजा होता.

Farmer ID Registration Maharashtra 2025

Farmer ID म्हणजे नक्की काय?

Farmer ID म्हणजे (Unique Identity Number) एक अद्वितीय ओळख क्रमांक जो की शेतकऱ्यांना राज्य व केंद्र सरकारकडून मिळतो. या Farmer ID च्या मदतीने शेतकऱ्यांना विविध योजनांचा थेट लाभ घेता येतो. उदा. पीकविमा योजना, कर्जमाफी, सुबसिडी, खत आणि बियाणांवर सवलत इ.

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी व नोंदणीची गरज :

  1. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 1.52 कोटी शेतकरी शेती हा व्यवसाय करत आहेत.
  2. या आकडेवारीनुसार 2025 पर्यंत अंदाजे महाराष्ट्र राज्यात फक्त 1 कोटी शेतकऱ्यांची डिजिटल नोंदणी झालेली आहे.
  3. तरी सुमारे 52 लाख शेतकरी अजूनही सरकारी योजनांपासून वंचित आहेत असे म्हणता येईल.

Farmer ID Registration Maharashtra 2025 – नोंदणी प्रक्रिया :

  1. Farmer ID Registration Maharashtra 2025 साठी पात्रता :
  • जमीनधारक शेतकरी (म्हणजे ज्यांच्याकडे शेती करण्यासाठी स्वतःची शेती आहे असे शेतकरी)
  • बटाईदार (lease वर शेती करणारे म्हणजे लांब मुदतीसाठी जमीन भाड्याने देण्याचा घेण्याचा कायदेशीर करार)
  • कृषी मजदूर (काही योजनांसाठी)

2. Farmer ID Registration साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर
  • 7/12 उतारा आणि आठ अ उतारा.

3. नोंदणी करण्याची प्रक्रिया :

ऑनलाईन प्रक्रिया :

  • Farmer ID Registration करण्यासाठी सर्वात पहिला खाली दिलेल्या अधिकृत पोर्टलला भेट द्या https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/
  • लॉगिन करण्यासाठी –> “Farmers Registration” या बटनावरती क्लिक करा.
  • त्यानतंर OTP व्हेरिफिकेशन करून फॉर्म भरा.

ऑफलाईन प्रक्रिया :

  • तुमच्या जवळ असणाऱ्या CSC (Common Service Center) ला भेट द्या.
  • लागणारी आवश्यक कागदपत्रे घेऊन ऑपरेटरच्या मदतीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

Farmer ID काढण्याचे इतर फायदे – जे की सर्वांना माहित नाहीत :

1. PM-KISAN योजनेसाठी अनिवार्य आहे :

Farmer ID असल्याशिवाय प्रधान मंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा लाभ घेता येत नाही.

2. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) साठी आवश्यक आहे :

सरकारद्वारे मिळणारी सगळी सवलत थेट बँक खात्यामध्ये मिळवण्यासाठी Farmer ID असणे आवश्यक आहे.

3. e-KYC आणि आधार लिंकींगसोबत जोडलेले आहे :

शासन e-KYC अनिवार्य करत असल्यामुळे Farmer ID असेल तर ही प्रोसेस सोपी होऊन जाते.

4. स्मार्ट कार्ड सारखी ओळख :

Farmer ID हे भविष्यामध्ये डिजिटल ओळखपत्र म्हणून वापरले जाऊ शकते. जे की कृषी बाजारपेठ मध्ये सुद्धा उपयोगी पडेल.

Farmer ID काढण्यापूर्वी या चुका टाळा :

  1. चुकीची कागदपत्रे : 7/12 उतारा हा अपडेट करून मगच अपलोड करा.
  2. बँक खाते आधार सोबत लिंक नसणे : बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक आहे का तपासा, आणि लिंक नसेल तर बँकेमध्ये जाऊन लिंक करून घ्या.
  3. मोबाईल नंबर ऍक्टिव्ह नसणे : नोंदणी करण्यापूर्वी मोबाईल नंबर चालू आहे का ते तपासा.
  4. एजंटकडून फसवणूक : फसवणूक होऊ नये यासाठी फक्त अधिकृत पोर्टलचा वापर करा किंवा CSC केंद्राला भेट देऊन मगच नोंदणी करा.

Farmer ID संबंधित घ्यावयाची सुरक्षितता :

  • तुमची संपूर्ण माहिती ही एन्क्रिप्शन प्रणालीद्वारे सुरक्षित ठेवली जाते.
  • ऑनलाईन पद्धतीने फसवणूक होण्यापासून वाचण्यासाठी कोणालाही OTP शेअर करू नका.
  • शासनाचे अधिकृत पोर्टल सोडून इतर कोणत्याही वेबसाईटवर माहिती शेअर करू नका.

भविष्याच्या दृष्टिकोनातून काही धोरणे :

महाराष्ट्र सरकार हे Farmer ID प्रणालीला पुढच्या ५ वर्षांमध्ये खाली दिलेल्या गोष्टींसोबत एकत्र करणार आहे :

  • डिजिटल शेती नकाशा (Digital Crop Mapping)
  • कृषी विमा कंपनी सोबत थेट लिंक होणार आहे.
  • e-Krishi Bazaar आणि e-Mandi साठी लॉगिन सुविधा देण्यात येणार आहे.

सरकारच्या इतर योजना :

मदतीसाठी खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधा :

  • MAHADBT हेल्पलाईन : 1800-120-8040

निष्कर्ष :

राम पाटीलसारखे बरेच शेतकरी आज Farmer ID Registration Maharashtra 2025 या प्रक्रिये मार्फत त्यांच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल घडवताना दिसत आहेत. ही फक्त ओळखच नसून, तुमच्या कष्टाचे अधिकृत प्रमाणपत्र आहे. तर तुम्ही Farmer ID साठी आजच नोंदणी करा आणि तुमच्या हक्काचे लाभ मिळवा.

Leave a Comment